महाराष्ट्र ग्रामीण
अंबरनाथ: न सांगता घरातून निघून गेल्याची घटना
आताचा १० वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी

अंबरनाथ: खूंटवली शिवलिंग नगर खामकर वाडी परिसरात राहणारे दोन मुले बेपत्ता ,साधारणता वय वर्ष १५ ते १६ वर्ष वयोगटातील आहेत. न सांगता घरातून निघून जाण्याची घटना अंबरनाथ येथे घडलेली आहे. अवघे ३६ तास उलटून गेले अद्यापही प्रश्न मार्गी लागलेला नाही अंबरनाथ पोलिस प्रशासन यांचीही शोध मोहीम सुरूच आहे पण अद्यापही हाती काहीच न लागल्याने मुलांचे आई वडील पुर्णतः चिंतेत पडलेले आहेत.साहिल विनोद मिश्रा व सागर संतोष गावित अशी या दोन मुलांची नावे आहेत. अद्याप ही बालके कोणाच्या निदर्शनास आल्यास कृपया विनोद मिश्रा ९५८८६५२११२ किंवा ८८०५७७७३६० या क्रमांकावर संपर्क साधावा