ड्युटीवर असतानाही आय. पी. एल बघण्यास गेले 3 पोलिस कर्मचारी
जुगाराचा अड्डा चालवणाऱ्यानेच दिले तिकीट

अंबरनाथ: अंबरनाथ पोलिस स्टेशन मधील ३ पोलिस कर्मचारी वर्ग ऑन ड्यूटी असतानाही आय पी एल मॅच पाहण्यास मुंबईत रवाना. अंबरनाथ मध्ये जुगाराचा व्यवसाय करणारे रमो शेख यांनी दिली होती आय पी एल चे तिकीट, या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी अंबरनाथ मधील मराठी वृत्तपत्राचे संपादक प्रफुल थोरात यांनी मुख्यमंत्री व पोलिस आयुक्त ठाणे यांना तक्रार दाखल केली
या पोलिस कर्मचारी वर्गांची नावे पी सी. सागर मुडे, पी सी. अनिल ठोंबरे हवालदार दत्तात्रय विषे असे आहेत. हे तीन पोलिस कर्मचारी वर्ग ऑन ड्यूटी असतानाही मुबईतील प्रसिद्ध असलेले वाणखेडे स्टेडियम वर मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल हा सामना पाहण्यास पोहोचले. सामना पाहण्याचा आनंद घेतांना त्यांचे फोटो सुध्दा वायरल झालेला आहे. या तीन पोलिस कर्मचारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी, डीसिपी यांच्या परमिशने नुसार किंवा हाफ डे असे न सांगता हा प्रकार घडलेला आहे.
असा आरोप प्रफुल्ल थोरात यांनी केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे तीघे पोलिस ठाण्यातील कलेक्टर आहेत. या तिघांना शहरातील मटका , जुगार चालवणारे शेख यांनी तिकिटे उपलब्ध करून दिली. या सर्वांची मोबाईल सीडीआर जरी काढून घेतले तरी पूर्णतः डिटेल्स सहित हे तिघे वानखेडे स्टेडियम वरच होते. या विषयाची पूर्णतः चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रफुल्ल थोरात यांनी केली आहे. अंबरनाथ पोलिस प्रशासनाचे एसीपी या प्रकरणी चौकशी करत आहे.