महाराष्ट्र ग्रामीण
माझी उपनगराध्यक्ष धावले भूमिपुत्रांच्या मदतीला
मच्छी विक्रेत्यांना योग्य न्याय मिळेल का ?

अंबरनाथ : अंबरनाथ शिवाजी चौक परिसरात गेली ३० ते ४० वर्षापासून अंबरनाथ येथे वास्तव्यास असलेले भूमिपुत्र कोळी बांधव आपला मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असतांना अचानक त्यांचा मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायासंदर्भात उदरनिर्वाह प्रश्न एका बिल्डरच्या मुजोरपणामुळे ऐरणीवर आला आहे, हि बाब लक्षात घेत, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख तत्काळ मच्छी विक्रेत्यांची भेट घेत, त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी नरेंद्र संख्ये यांची भेट घेतली, व एका बिल्डरच्या सांगण्यावरून गोरगरीब मच्छी विक्रेत्यांना असा त्रास देणे हे योग्य नाही असे खडसावत, पालिका प्रशासनाने काय तो पाठपुरावा योग्य रीतीने पडताळणी करून गोरगरीब मच्छी विक्रेत्यांना न्याय मिळायला हवा असे संबोधित करण्यात आले.




