अंबरनाथमध्ये आठ वर्षांच्या बालकांवर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार
पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण : कुटुंबासोबत राहत असलेला एका मुलावर गेल्या महिन्यात अंबरनाथमध्ये चार अल्पवयीन मुलांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी उशिरा अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली.
पोलीसांनी चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.१३ ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुले अंबरनाथ पूर्व गायकवाड पाडा विभागांतील रहिवासी आहेत.
पीडित मुलाच्या आईने अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात गुन्हा दाखल. चार अल्पवयीन मुलांनी आठ वर्षांच्या मुलाला पकडले त्याला जबरदस्तीने अंबरनाथ मधील निर्जन ठिकाणी असलेल्या एका पडक्या खोलीत नेले. तेथे त्याच्यावर अश्लील पद्धतीने चार अल्पवयीन मुलांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.
Nice