
मुंब्र्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेला मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलना दरम्यान सरळ वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून हटवण्याची भाषा केली. जाधव यांचे हे वक्तव्य संतापजनक असून या वक्तव्याचा निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी रेल्वे स्टेशन परिसराबाहेर निदर्शने करत निषेध व्यक्त केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता विक्रेतेच वाचकापर्यंत वृत्तपत्र पोहचवतात. जर, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर येत असाल तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला आहे.
एक बाजू पाहिली तर काही वर्षांपूर्वी एलीफिसटन रोड या स्थानकांवर वृत्तपत्र विक्रेत्यावर कारवाही झाली होती त्या वेळी स्वतः राज साहेब ठाकरे यांचे वक्तव्य होते वृत्तपत्र विक्रेत्यांच्या व्यवसायात हात लावाल तर खबरदार पण ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांचे वृत्तपत्र पत्र विक्रेता यांच्या विरोधात केलेले वक्तव्य खूप लज्जास्पद बाब आहे.
हाच एकमेव व्यवसाय असा राहिलेला आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे. त्यामूळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारया मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात वृत्तपत्र विक्रेत्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात दिलीप चिंचोले, वैभव म्हात्रे, विवेक आसामचे, निलेश कदम,, संतोष शिंदे, केशव शिर्के, जितेंद्र क्षिरसागर, संदिप आवारे आदींसह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी होते.