अंबरनाथ मध्ये शंकर हाइट्स फेज १ सोसायटीचा आगळा वेगळा उपक्रम
सफाई कामगार महिला कर्मचारी यांच्या हस्ते केले ध्वजारोहण

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम विभाग १५ ऑगस्ट रोजी चिंचपाडा परिसरात वसलेली नामांकित अशी शंकर हाइट्स या सोसायटीच्या वतीने राबविलेला एक अनोखा,आगळा वेगळा उपक्रम सोसायटी मध्ये गेली कित्येक वर्षांपासून साफ सफाई करणाऱ्या एका वयस्कर वृद्ध महिलेच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. विशेष म्हणजे सफाई कामगार महिला कर्मचारी छाया मोरे यांचे पती दिवंगत पांडुरंग मोरे हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या देशसेवीची कृतज्ञता म्हणून त्यांच्या पत्नी छाया मोरे त्यांच्या पश्चात सोसायटी मध्ये साफसफाईचे काम करतात. त्यांच्या ह्या कार्याला मानसन्मान म्हणून शंकर हाईट फेज १ या सोसायटीच्या वतीने ध्वजारोहणाचा मान देण्यात आला,व त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण घडवून आणले. याप्रसंगी सोसायटीचे सर्व सदस्य , लहान मुले, जेष्ठ नागरिक सोसायटीचे पदाधिकारी नितीन निकाळजे, प्रसाद नायर, अमर पाटील, सुशांत घरत, अभिलाष कावली ईतर सर्व सोसायटी मेंबर उपस्थित होते.