महाराष्ट्र ग्रामीण
शेतकऱ्याच्या लेकीचे स्वप्न पूर्ण होतांना दिसतंय
अंबरनाथ महात्मा गांधी हायस्कूल ची विद्यार्थिनी

जळगाव जिल्ह्यातील कुंभारी या खेडेगावातील एक कष्टकरी शेतकरी किशोर जोशी यांची कन्या कु.नम्रता किशोर जोशी र्हिने सन 2022/23 साली अंबरनाथ मधील महात्मा गांधी विद्यालय या शाळेतून इयत्ता १० वी मधून प्रथम क्रमांक पटकावत अभ्यासात अती हुशार असलेली विद्यार्थीनी हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होतांना दिसत आहे. अभ्यासाची चिकाटी व जिद्दीमुळे कु. नम्रता वय वर्ष १८ हिला अखेर मुंबईतील नामांकित अशा तेरणा मेडिकल कॉलेज मध्ये MBBS या शिक्षणासाठी निवड झालीच.अशा कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळणे ही एक कठीणच बाब होती. ही बातमी समजताच कु. नम्रता जोशी हिचे कौतुक तर होतच आहे, व पुढील वाटचालीचा वर्षाव ही जळगाव (कुंभारी)व अंबरनाथ मधून मिळत आहे