महाराष्ट्र ग्रामीण
श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खुंटवली अंबरनाथ
गौरव पुरस्कार चे मानकरी

अंबरनाथ : सार्वजनिक श्री गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला, अंबरनाथ पोलीस प्रशासनाच्या नजरेत या उत्सवाचे खरे मानकरी श्री. सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठरले, श्री गणेशाची स्थापना ते विसर्जनापर्यंत ,कायदा, सुव्यवस्था राखणे , शिस्तबद्ध पद्धतीची मिरवणूक असे बरेच काही पोलीस प्रशासनाचे नियम कटीबद्ध पध्दतीने पाळत, पोलीस प्रशासनाच्या गीराय पुरस्कार स्पर्धेत , सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला उतेजनार्थ असे संबोधित करून मंडळाचे कार्यकर्ते सागर देवकाटे ,आकाश कुले, अजय सिंग, सलमान शेख व ईतर सहकारी यांच्या कौतुकास्पद कार्याला अंबरनाथ पोलीस प्रशासना तर्फे प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.