
अंबरनाथ : शिवबा ग्रूप संस्थापक अध्यक्ष श्री सुमित भालेराव व ग्रुपचे महिला अधिकारी श्रीमती. वंदना भुरकुंडे यांचा अंबरनाथ मध्ये एक अनोखा कौतुकास्पद उपक्रम, दसरा हा भारतातील सर्वात मोठा सण, सण साजरा करण्यासाठी झेंडूची तोरण व आपट्याची पाने याला खूप महत्त्व असते,ते आपल्यापर्यंत पोहोचते कसे कधी याचा विचार केलाय का, याचा विचार केला तो म्हणजे अंबरनाथ मधील शिवबा ग्रूप ने, डोंगराळ,भागातून दोन पैसे मिळावे त्यासाठी गोरगरीब आदिवासी, बांधवाची दसरा येण्याअगोदरच लगबग सुरू होते, रात्र दिवस एक करून दसऱ्याच्या एक दिवस आधीच तोरण व आपट्याची पाने रात्री मध्य रात्री वेळेचे भान न ठेवता आदिवासी महिलावर्ग, पुरुषवर्ग, लहान मुले भेटेल त्या जागेवर विक्रीसाठी येऊन बसतात, मिळून मिळून मिळणार तरी किती उत्पन्न यांत त्याची तहान आहे भूक आहे हीच बाब लक्षात घेऊन शिवबा ग्रूप अंबरनाथ यांच्या वतीने दसऱ्याच्या एक दिवस आधी जेवण व दुसऱ्या दिवशी सणाचा गोडवा अल्पोपहार (मिठाई)त्यांना हवं असलेले मोलाचे सहकार्य विक्रीसाठी आलेल्या काटकरी,आदिवासी नागरिकांना करण्यात आले. याप्रसंगी शिवबा ग्रूप चे इतर सदस्य आकाश गुप्ता, महेश बांबळे ,सुजित ढाकी, प्रथमेश भुरकुंडे, मोहित जाधव, सक्षम जाधव,यांनीही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.