अंबरनाथ : गणेशनगर, विभागात राहणारे शिवसेनेचे कडवट सच्चे शिवसैनिक ,श्री. प्रकाश डावरे यांना शिवसेनेतर्फे अधिकृत तिकीट न दिल्याने नागरिकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे असे आहे कि जेव्हा पासून आम्ही पाहत आहे एक सच्चा शिवसैनिक शहर प्रमुख श्री.अरविंद वाळेकर यांचा शिष्य विभागातील एक कणखर,नेतृत्व प्रकाश डावरे हे कायम शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना सहकार्य करत आलेले आहेत, स्थानिकांच्या घरात दुःख असो किंवा सुख असो डावरे कुटुंब सदैव सहकार्यास धावून आलेले आहे, शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेले गणेशनगर विभागातील ,शिवसेनेचे महत्वाचे शिलेदार प्रकाश डावरे हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार असे नागरिकांच्या मनात असताना शिंदे सरकारने शिवसेनेचे अधिकृत तिकीट प्रकाश डावरे यांना न दिल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, सच्चा कार्यकर्ता कोण असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे प्रकाश डावरे यांच्यावर असा अन्याय का ,वेळ पडल्यास आम्ही शिंदे साहेब यांना हा प्रश्न विचारू स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता समजले.
