आर्थिक घडामोडी

भाजपा उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हल्ला

चार राऊंड फायरिंग केल्याची माहिती

अंबरनाथ : कल्याण बदलापूर हायवे लगत असलेला भेंडीपाडा परिसरातील शंकर मंदिर समोरील भाजपा उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार करण्याची घटना समोर आली. घटनेचा पूर्णतः  खेळ,छायाचित्रे, सी.सी कॅमेरात कैद झाले असून रात्रीच्या 12.15 मिनिटांनी ही घटना घडली,गोळीबार होताच वाळेकर यांच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षक बाहेर पडले ,मात्र त्याच्याही दिशेने हा गोळीबार करण्यात आला , या हल्यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसुन , मात्र सुरक्षा रक्षक जखमी झाला. 

Oplus_16908288

अवघे दोन दिवस मतदानाला शिल्लक असतांना शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला, असतांना याप्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमक भुमिकेत उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button