अंबरनाथ मध्ये कमळाला हाताचा आधार
भाजपला भोगावे लागेल महापालिका निवडणुकीत -आमदार किणीकर
अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप काँग्रेस चे एक वेगळेच समीकरण केलेले पहावयास मिळत आहे. याचे परिणाम भाजपला महाराष्ट्रात होत असलेली महानगरपालिका निवडणूकीत भोगावे लागेल. असे वक्तव्य आमदार किणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. किणीकर यांनी अंबरनाथ मध्ये युती बाबत रवींद्र चव्हाण यांच्या सोबत बैठक ही घेतली ती पूर्णतः सकारात्मक झाली. पण स्थानिक भाजपा नेत्यांनी त्याचेही न ऐकता, आपल्या मनमर्जीचा कारभार करत काँगेस सोबत युती केली आहे. आम्ही नगरपालिकेत विरोधक म्हणून उभे तर राहणार तर आहोच आम्हाला पटले तर बरे नाहीतर आमचा विरोध हा राहणारच,
किणीकर यांच्या म्हणण्यानुसार केंद्रात, राज्यात भाजपा+शिवसेना युती आहे पण भाजपाने अंबरनाथ मध्ये हिंदू विरोधात असलेले काँग्रेस सोबत हात मिळवणी करून एक अभद्र दर्जाचे काम केले आहे. किणीकर म्हणाले असता अंबरनाथमध्ये सर्वात जास्त आमचे २७ नगरसेवक निवडून आले असतांना असे वेगळे समीकरण का कशासाठी?
या सर्वावर मात करत भाजप चे नगरसेवक यांची प्रतिक्रिया अशी समोर आली अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असून अंबरनाथचा विकास हाच आमचा उद्देश आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.


