अंबरनाथ : काँगेसच्या नगरसेवकांच्या हाती कमळाची दांडी देऊनही , अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळवले .राष्ट्रवादी गटाचे चार आणि एक अपक्ष असे एकूण ३२ नगरसेवक अशी नव्याने मूठ बांधत नगरपरिषदेवर स्थापनेचा दावा केला आहे .याविषयी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी ठाण्यात घोषणाही केली आहे. त्यामुळे अंबरनाथ भाजपला टीकेचे धनी असलेली काँग्रेस ची साथ महागात पडलेली आहे .सत्तेसाठी आपला पक्ष सोडणारे काँग्रेसी नगरसेवक यांचे हात रिकामे राहिलेले आहे . या सर्व हालचालीचा वेध घेत शिवसेना शिंदे गटाने पूर्ण डावच उलटवला आहे.

