काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निलंबित रात्री भाजपात प्रवेश
अंबरनाथ राजकीय समीकरणाचे बदलते रूप
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एक वेगळ्याच पद्धतीचे पॅटर्न जनतेला पहावयास मिळाले काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले १२ नगरसेवक यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तत्पशात या १२ ही नगरसेवकांनी रात्री उशिरा भाजपात प्रवेश केला. रवींद्र चव्हाण हे घोषणा करत म्हणाले हे नगरसेवक सत्तेसाठी नव्हे तर अंबरनाथच्या विकासाच्या हेतूने आमच्या सोबत आले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक जनतेने त्यांना निवडून दिले होते जनतेला त्यांनी विकास कामाचे शब्द दिले होते भाजप सरकार गतिमान पद्धतीने कार्य करत आहे हे पाहता जनतेला योग्य न्याय मिळेल त्यामुळेच ह्या नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ मध्ये निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी भाजपची वाट धरलेली आहे. अंबरनाथ मध्ये झालेल्या काँग्रेस+भाजप युतीच्या उधाणलेल्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.


