अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेत अजित दादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला धक्का देणाऱ्या शिंदे गटाला चांगलीच चपराक बसली आहे.नगरपरिषदेतील विविध समित्या स्थापनेला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आह.
शिंदेगटाने अजित पवारांचे नगरसेवक घेऊन स्थापन केलेल्या शिवसेना अंबरनाथ महायुती विकास आघाडीला भाजपच्या अंबरनाथ विकास आघाडीने याचिका दाखल करुन आव्हान दिले आहे. यातील वैध आघाडी कोणती हे आम्ही ठरवायचे का जिल्हाधिकारी यांनी हे तुम्हीच आम्हाला सोमवारी सांगा, असे सांगत न्यायालयाने सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या समित्या स्थापनेला अंतरिम स्थगिती दिली.

