महाराष्ट्र ग्रामीण
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा

Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले होते की, मंत्रिपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा करुणा शर्मा यांनी केलाय.
Karuna Sharma on Dhananjay Munde : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शपथपत्रात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाइन तक्रार केली होती. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केलाय. सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.