महाराष्ट्र ग्रामीण
ठाणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी बोलण्यास बंदी
राज्य सरकारने शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये मराठी भाषेला योग्य स्थान दिले असतांनाही मात्र काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासन निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास मनाई केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे . आयसीएसई आणि सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काही बोलायचे असल्यास फक्त इंग्रजीच बोलण्याची सक्ती केली जात असुन , मराठीत बोलण्यास मनाई केली जात असल्याची तक्रारी पालकांनी मनसेचे म्हणने आहे. मनसेने याबाबत त्वरित शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले यांची भेट घेऊन अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले.
शासकीय विभागात मराठीचाच वापर करावा यासाठी पदाधिकाऱ्यांना सक्रिय राहण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते.या आदेशानंतरच ठाण्यात मनसे आक्रमक झाली आहे.