अंबरनाथ : कोहोजगाव विभागात राहणारे माजी नगरसेवक उमेश अनंता पाटील यांचे सुपुत्र जतिन उमेश पाटील अवघे वयाच्या २० वर्षातच पायलट बनण्याची जिद्द दाखवून दिली. जतिन हा लहानपणापासूनच आपण पायलट बनूच असा दृढ विश्वास मनात ठेवून होताच, शेवटी खऱ्या अर्थाने आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले. ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण वैमानिक होण्याचा मान मिळवला.