महाराष्ट्र ग्रामीण

अंबरनाथ नगरपरिषद अतिक्रमण विभागाची मोठ्या प्रमाणावर तोडक कारवाही

100 टपऱ्या अवैध रित्या अतिक्रमण 2 जेसीबी पोलिसांच्या मोठ्या प्रमाणाच्या बंदोबस्तात कारवाई

अंबरनाथ नगरपरिषद अतिक्रमणे विभागाद्वारे बुधवार ७ मे रोजी कल्याण बदलापूर महामार्ग रस्त्यालगत असलेल्या हातगाड्या, चायनीज, व इतर अतिक्रमण केलेल्या दुकानांवर जेसीबीच्या साहाय्याने सर्व जमीनदोस्त करण्यात आले. ९० ते १०० च्या आसपास असलेल्या हातगाड्या पोलिस प्रशासनाच्या मोठ्या बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले.अंबरनाथ मधील मोक्याची ठिकाणे असलेले कोहोजगाव, चिंचपाडा,मटकाचौक, फॉरेस्ट नाका, विमको नाका ,लादी नाका या ठिकाणावरील अतिक्रमण हटवण्यात पालिकेला यश आले. नवनिर्वाचित मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संख्ये, सुनिल गावित, व कर्मचारी वर्ग तसेच नगर रचनाकार विभागाचे अधिकारी या सर्वांनी मिळून अंबरनाथ मधील सर्वात मोठी तोडक कारवाही करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button