तीन झाडी परिसरात झालेली हत्या
शरीरापासून वेगळे केलेले मुंडके हत्येचा छडा अखेर मार्गी

अंबरनाथ: अंबरनाथ तीन झाडी परिसरातील शरीरापासून वेगळे केलेले मुंडके हत्येचा छडा अखेर वाशिंद क्राइम ब्रांच ग्रामीण पोलिस प्रशासनाने मोठ्या हुशारीने मार्गी लावला. सावत्र लहान भाऊ सलमान गौरी अंसारी (२५) याने आपला मोठा भाऊ फैसल गौरी अंसारी (२७) याला टिटवाळ्यावरून कार मध्ये बसवून तीन झाडी परिसरात आणले व त्याचे शरीरापासून मुंडके वेगळे करत दुर्दैवी हत्या करण्यात आली. मुंडके आपल्या सोबत घेऊन जाऊन नाशिक परिसरातील नाल्यात फेकण्यात आले. स्थानिक क्राइम ब्रांच शाखा वाशिंद विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांचे पथक यांनी मोठ्या हुशारीने हत्या झालेल्या दिवसाचे ४०० ते ५०० गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहत एका कारवर संशय घेत.कारच्या नंबरच्या आधारे , मालकाच्या नावाचा शोध लावला व अटक करण्यात आली. सलमान गौरी याने गुन्हा कबूल करत मी फैसल गौरी याची तीन झाड परिसरात नेऊन हत्या केली व मुंडके नाशिक परिसरातील नाल्यात फेकले असा कबुली जवाब पोलिसांना दिला. नाल्यात फेकलेले मुंडके याचा अद्याप शोध लागलेला नाही, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांनी सांगितले.