आर्थिक घडामोडी
गांवदेवी ते खुंटवली रस्त्यावर जीवावर बेतनारा खड्डा

अंबरनाथ : गांवदेवी ते खुंटवली मुख्य रस्त्यावर पटेल स्टोवह रिपेरिंग यांच्या दुकानासमोर चेंबर लगत पडलेला भला मोठा खड्डा सकाळी पाण्याचा विसर्ग प्रमाणाच्या बाहेर होतांना निदर्शनास येत आहे पाईप लाइन लिकेज् आहे का चेंबर याचा पाठपुरावा करणार कोण अद्याप हे समजलेले नाही ? स्थानिक नागरिक या समस्येला कंटाळले आहे ,अवघ्या दोन ते तीन दिवसापासून दुचाकी स्वारांचे भले मोठे अपघात पहावयास मिळत आहे मंगळवारी रात्री ११..४५ वाजता एक दुचाकी स्वार त्या खड्यात आपटून मोठा अपघात झाला. गेली ३ ते ४ महिन्यापासून पडलेला हा छोटा खड्डा आता मृत्यूचा मोठा खड्डा बनलेला आहे. प्रशासन झोपलेलेच बहुतेक प्रशासन जागे होईल ते म्हणजे कोणाचा बळी पडल्यावरच.