महाराष्ट्र ग्रामीण
नागरिकांना होणारी गैरसोयीचा प्रश्न अखेर मार्गी
भाकरे बिल्डिंग समोरील खडयाचा प्रश्न सुटला

अंबरनाथ: गांवदेवी ते खुंटवली रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्ड्याचा विषय अखेर मार्गी, भाकरे बिल्डिंग ते वाळेकर हॉल पर्यंत ,या परिसरात चेंबर लाइन पूर्णतः खराब झाल्यामुळे स्थानिक नागरिक, व येणाऱ्या जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.हि बाब लक्षात घेऊन, त्वरित युवासेना निरीक्षक कल्याण व भिवंडी माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी पालिका प्रशासनाचे कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने जनतेला होणाऱ्या त्रासाचा प्रश्न मार्गी लावला. याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. गीता डामसे, आशिष पानसरे , स्थानिक नागरिक उपस्थित.