
अंबरनाथ : अंबरनाथ वार्ड क्रमांक १० मध्ये मतदानापूर्वी च्या हालचालींना वेग,विभागातून विकास हेमराज सोमेश्वर रिंगणात उतरून शक्तिप्रदर्शना मार्फत नागरिकांचे पूर्णतः लक्ष आपल्याकडे केंद्रित करत असतांना दिसत आहे. विकास नावातच विकास या वक्तव्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद पहावयास मिळत आहे.
खोलवर पाहिले असता विकास हेमराज सोमेश्वर हे कायमच जनतेसाठी एक सामाजिक असो वा वैयक्तिक काम करत आलेले एक जबरदस्त व्यक्तिमत्व ठरलेले आहे.
समस्या लाईटीची,असो वा पाण्याची परिसर कोणताही असो सोमेश्वर यांच्या दरबारी गेला कि तो मार्गी लागलाच समझा, असे ह्यांची छबी जनतेच्या मनात घर करून बसलेली आहे त्यावर शंका नाही. सोमेश्वर यांच्या दरबारी गेल्यास योग्यच न्याय हिच भुमिका अंबरनाथ मधील जनतेने अनुभवलेली आहे, आजवर सामान्य नागरिकांचे असे कित्येक उदाहरणे आहेत जी विकास सोमेश्वर यांनी मार्गी लावले आहेत. विकास सोमेश्वर यांचे एक वैशिष्ट्य आहे मुद्दा कोणताही असो त्वरित ॲक्शनमोड हेच आपले ध्येय घेऊन जनतेच्या मनामनात बसलेले आहे.
स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधला असता आम्हाला असाच काम कोणतेही असो त्वरित मार्गी लावणारा नेताच हवा होता,असे स्पष्ट मत स्थानिक नागरिक देत आहेत. विकास सोमेश्वर स्थानिक नागरिकांना जसे माझे नाव तसाच तुमच्या विभागात विकास हेच माझे ध्येय, हीच माझी ओळख, हाच माझा उद्देश असेल अशी ग्वाही स्थानिकांना देत लक्ष केंद्रित केले आहे.
