
आताच पार पडलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनीता म्हसकर व राम म्हसकर यांचे नागरिकांमध्ये एक वेगळ्याच जिव्हाळ्याचे नाते पहावयास मिळाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस ओमकार युवा मित्र मंडळ परिसरातील स्थानिक नागरिकांच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या आनंदाक्षणी विभागातील लहान,थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम म्हसकर व सुनीता म्हसकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आम्ही हरलो नसून आम्ही जितलो आहे ते म्हणजे तुमच्या सारखी जिवाभावाची माणसे मुळात हाच आमचा विजय आहे असे वक्तव्य त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे पूर्णतः नियोजन सुनील दुबे, सन्नी वाझ, सुरज भगत, किशोर शिंदे, पवन खांडेकर,पुष्पा दुबे, वर्षा गुजर, रोमा भगत, गौतमी जाधव
उमेदवार मनिषा गोडसे आदि विभागातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.