अंबरनाथमध्ये शिंदेंच्या सेनेने टाकला मोठा डाव
राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांचे शिवसेनेला समर्थन
अंबरनाथ : कालपर्यंत भाजप सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी दिले शिवसेनेला समर्थन, त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहील असे चित्र दिसत आहे .अंबरनाथ सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. एक अपक्ष उमेदवार घेऊन सेनेचे बळ २८ वर पाेहचले असले तरीही शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी २ नगरसेवकांची कमतरता होती , सध्याच्या किंगमेकर भूमिकेत असलेले राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक यांनी भाजपला साथ दिली होती ? ,तसेच काँगेस पक्षाचे निलंबीत १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपचे संख्याबळ १५ वरुण ३१ वर पोहोचलेही होते. येत्या सोमवारी अर्थात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचाच उपनगराध्यक्ष बसेल असे वातावरण निर्माण झाले असतांना ,आज गट नोंदणी दरम्यान राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी अचानकपणे शिवसेनेला समर्थन दिले असून त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ३२ वर पोहोचले असून उपनगराध्यक्ष शिवसेनेचाचा व विशेष समित्या शिवसेनेकडेच राहणार असे स्पष्ट दिसत आहे, निवडणूका झाल्या जरी असल्या तरी अंबरनाथचा वाली कोण याकडे अंबरनाथच्या जनतेचे लक्ष लागले आहे..

