आर्थिक घडामोडी
अंबरनाथ शहर शिवजयंती उत्सव
गणेश नगर विभाग माजी नगराध्यक्षा सौ. मनिषा वाळेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन

शहर प्रमुख श्री अरविंदजी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २७ वर्षे चालत असलेला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, अंबरनाथ पश्चिम परिसरातील गणेशनगर वरचा पाडा विभागात माजी नगराध्यक्षा सौ. मनिषा वाळेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याप्रसंगी विभागप्रमुख प्रकाश डावरे (सर) ,वैभव डावरे,सुदाम क्षीरसागर,नीता परदेशी आदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.