महाराष्ट्र ग्रामीण

कल्याण: शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना भर रस्त्यात मारहाण गैरवर्तन केल्याने चोप दिल्याचा महिलेचा दावा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात सोमवरी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या राणी दिलीप कपोते यांनी भररस्त्यात शिंदेगट शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना चोप दिला. यासंदर्भातील दृश्यध्वनी , चित्र समाज माध्यमावर प्रसारित झाले आहेत.

माझी नगरसेवक मोहन उगले यांना महिलेने बेदम मारहाण केल्याची जोरदार चर्चा कल्याण, डोंबिवली  शहर परिसरात सुरू आहे . विकास कामाच्या भूमीपूजनातील श्रेयवादावरून हा वाद झाल्याची चर्चा मिळालेल्या माहितीनुसार डॉ . तेलवने रुग्णालया समोरील परिसरात रविवारी रस्त्याचा कामाचा शुभारंभ झाला होता. यावेळी माजी नगरसेवक मोहन उगले आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी भूमी पूजनाच्या कार्यक्रमावरुन धुसफूस झाली होती.

मोहन उगले यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.रविवारी आपल्या भागात एक भुमिपुजनाचा कार्यक्रम झाला होता.तेथे काही प्रकार घडला होता . त्यानंतर त्वरित आपण पालिकेत आलो. कायद्याने महिलांना संरक्षण आहे. अद्याप आपण त्या महिलेला काहीही बोललेलो नाही आणि बोलणार सुध्दा नाही. शिवसेनेशी त्यांचा संबंध नाही. मात्र, पक्षाने अशा कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करायला हवी. घडल्या प्रकाराची कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button