
मुंबई : काही दिवसांपूर्वी गाजलेले प्रकरण टोरेस संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड सह ८ जणाविरुद्ध २७ हजार १४२ पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे.
फसवणूकीचा आकडा १४२.५८ कोटींवर गेला असून,अजुनही तक्रारी येतच आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड तानिया उर्फ ताजगुल एक्सतोव्हा , व्हेलेंटिना कुमार, शैलेश सुर्वे , अल्पेश खारा ,तोसिफ रियाज , आर्मेन अटिअॕन, ललन सिंग यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे . याप्रकरणी आतापर्यंत १४ हजार १५७ गुंतवणूक दार पुढे आले असून . तक्रार अर्ज अद्याप सुरूच आहे . यातील पसारा झालेले आरोपी यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरु आहे.