महाराष्ट्र ग्रामीण
रायगढ क्राइम: ८० वर्षीय थेरडयाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार खाऊचे अमिष दाखवून राक्षसी कृत्य

रायगड क्राइम: एका ८० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आरोपी हमजा यासीन दाभीळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नराधमाचे किराणा मालाचे दुकान असून या दुकानात एका ३ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आले आहे.घडलेला संपुर्ण प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितला असता, लगेचच संतप्त झालेल्या वडिलांनी goregav पोलिस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी मेडिकल चौकशी रिपोट नुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड होताच , आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी हमजा यासीन दाभीळकर यांना अटक केली असून पुढील तपास करत आहेत