महाराष्ट्र ग्रामीण
अंबरनाथ गावदेवी चौक पश्चिम विभागात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
गावदेवी मंदिर प्रतिष्ठान आयोजित श्री राम नवमी साजरी

अंबरनाथ: गावदेवी चौक अंबरनाथ पश्चिम विभागात गावदेवी मंदिर प्रतिष्ठान आयोजित श्री. राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहर प्रमुख श्री. अरविंदजी वाळेकर यांच्या हस्ते श्रीरामांची मोठ्या भक्तीभावाने पूजा व आरती करण्यात आली, या आनंदाक्षणी मा.नगरसेवक निखिल वाळेकर, सौ.मनिषा वाळेकर व प्रकाश डावरे सर उपस्थित होते.
गांवदेवी मंदिर प्रतिष्ठान व कार्यकर्ते यांच्या वतीने या आनंदाक्षणी लाडूचा प्रसाद व पाणी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रशेखर बैनी , अशोक कोळी,राजु परदेशी, शेखर गवळी, मारुती कोळी व कार्यकर्ते सतीश वाढला, गणेश म्हेत्रे,बाबु खाडे, जयेश शिंदे, नागेश रेड्डी, अंब्रेश मडीविल व ईतर स्थानिक राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते