मृत्यू दाखल्याचे पैसे घेणे योग्य नाही _राजेंद्र वाळेकर

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदे तर्फे मृत्यु दाखल्याचे घेत असलेले पैसे (शुक्ल) त्वरित माफ करा ,अंबरनाथ चे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकरांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
अंबरनाथ नगरपरिषद तर्फे मृत व्यक्तीचा दाखल्यासाठी पालिका प्रशासन गेल्या कित्येक वर्षांपासून २५ रुपयाचे शुक्ल आकारत आहे, हे योग्य नाही अशा कित्येक मृत परिवारांच्या भावना आहेत. यासाठी पालिका प्रशासनाने मृत्यू दाखले मोफत द्यावी, अशी विनंती मुख्याधिकारी यांना केली. काही दिवसांपूर्वी पश्चिम विभागातील स्मशानभूमीत एक गरीब इसम मोहन गागडे यांनी आपल्या आईचा अंत्यविधी लाकडाच्या सहाय्याने केला, त्याचा खर्च जेमतेम ४ हजार रुपयांचा झाला परिस्थिती नसतांना ही तो त्याला कसाबसा द्यावा लागला, गागडे यांनी पालिका प्रशासनाला संदेश देत म्हणाले , एक गरीब व्यक्ती एवढे पैसे आणणार तरी कसे, पालिका प्रशासनाने ही रक्कम माफ करावी. या परिस्थितीचा आढाव घेत, राजेंद्र वाळेकर यांच्या म्हणण्यानुसार, अंबरनाथ मध्ये असे भरपूर प्रमाणात गोरगरिबांची संख्या आहे, जे रोज कमावून खाणारी , अंबरनाथमध्ये असे कोणी गोरगरीब असतील त्यांनी त्वरित वाळेकर परिवाराशी संपर्क साधावा. अंत्यविधी लागणारा जो काही खर्च असेल तो आम्ही देऊ, अंबरनाथ स्मशानभूमीचा नागरिकांना काडीमात्र फायदा होत नाही अंत्यविधीला लागणारा जो मोबदला जनतेकडून घेतला जातो त्याचा पुरेपूर उपयोग स्मशानभूमित दिसेना झालाय दुरावस्थेथ पडलेली अंबरनाथ स्मशानभूमी याकडे ही पालिका प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.