अंबरनाथ मध्ये वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहात साजरा
लढवय्या नेतृत्व हरी पवार साहेब यांच्या हस्ते साजरा

अंबरनाथ : आजचा प्रेरणादायी दिवस महान वैज्ञानिक भारतरत्न राष्ट्रपती डॉ ए.पी.जी अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच १५ ऑक्टोंबर हा दिवस पूर्णतः देशभरात लाखो वृत्तपत्र विक्रेता बांधव जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन (Newspaper Vendors Dey) संबोधित करून साजरा केला जातो.
अशाच प्रकारचा अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या माध्यमातून व समूहाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अंबरनाथ मधील कमलधाम वृद्धाश्रम येथे वास्तव्यास असलेले बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे जनरल सेक्रेटरी एक ‘लढवय्या नेता’ श्री.हरिश्चंद्र पवार साहेब यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले इतर वृद्ध महिला, पुरुष,कर्मचारी वर्ग यांना अल्पोपहार वाटप करून मोठ्या उत्साहात अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.
या आनंदाक्षणी संघटनेचे अरविंद निकम, कुंदन जाधव, उमेश नाईक, पौर्णिमा जावळे,चेतन जावळे वृत्तपत्र समुहाचे प्रतिनिधी अरविंद जाधव, दिनेश शेट्टी, सुधीर सावंत, निखिल वराडकर सुरेश ठाकूर,राकेश शुक्ला, संतोष पाटील, आशिष तिवारी ह्युमन राईट चे अजय नायर व कमलधाम वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.