अंबरनाथ येथे ह्युमन राईट कार्यालयाचे उद्घाटन
अंबरनाथच्या माझी नगराध्यक्ष सौ. मनिषा वाळेकर यांच्या हस्ते उद्घाटन

अंबरनाथ : ह्युमन राईट आणि सामाजिक कार्यकर्ते असोसिएशन कार्यालयाचे उद्घाटन.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे संघटक प्रभु खेडकर व अंबरनाथ नगरपरिषदेचे माझी नगराध्यक्षा. सौ. मनिषा वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ह्युमन राईट आणि सोशल ॲक्टिव्हिटी यांचे राष्ट्रिय सचिव ऍडव्होकेट सिंड्रेला गवळी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ४ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ छत्रपती शिवाजी भाजी मार्केट याठिकाणी उद्घाटन करण्यात आले. सदरचे कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी, असून, इतर काही जनतेला लागणारे सहकार्य ,अडचणी असतील यांच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करून मार्गी लागणार आहे.
या कार्यालयाचे प्रमुख प्रतिनिधीत्व असणारे महाराष्ट्र सह सचिव राजेश रहाणे , अंबरनाथ शहराचे उपाध्यक्ष नितीन लोंढे , संघटक अजय नायर , महिला उपाध्यक्षा प्रियंका पुजारी ह्या सर्व ह्युमन राईट्स च्या टीम नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असणाऱ आहे..