अंबरनाथ पालिका प्रशासनाने शहरातील नेत्यांचे फलक हटवले
अंबरनाथ : अंबरनाथ पालिका प्रशासनाच्या घोषणे नंतर, आदर्श आचारसहिता,लागू झाली लगेचच अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने मोठ्या सतर्कतेने, शहरात जागोजागी नेते मंडळी यांनी उभारलेले फलक, बॅनर काढण्याचे कार्य सुरू केले.
गुरुनानक जयंती सरकारी सुट्टी असतांनाही मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, तसेच मतदानाचे कार्य करण्यासाठी नेमणूक केलेले अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दिनांक १० नोव्हेंबर पासून इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल. मतदानापूर्वीची तयारी ह्याच कार्यात सर्व मग्न झालेले दृश्य निदर्शनास पडत आहे. ३ डिसेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालय येथे मतमोजणी होणार व येथूनच पूर्णतः निकाल जाहीर होणार.
पुढील निष्कर्ष काढत येत्या २ डिसेंबर रोजी २९ प्रभागातूनु ५९ नगरसेवक व नगराध्यक्ष निवड करण्यासाठी मतदार मतदान करतील ,अशी माहिती मिळालेली आहे


