अंबरनाथ : ७ नंबर विभागातून सुनीता राम म्हसकर या पराभूत झाल्या असल्या जरी, समाजसेवा हाच उद्देश राहील असे वक्तव्य श्री. राम म्हसकर व सुनीता म्हसकर यांच्या तोंडून निघत होते आम्ही पराभूत झालो नसून आम्ही विजयी झालो आहे. परिसरातील आपुलकीने जोडलेली माणसे, हेच आमच्या विजयाचे प्रतीक आहेत. राम म्हसकर व सुनीता म्हसकर यांच्या राहत्या घरी निकालानंतरही विभागामधून जवळीक झालेली जिवाभावाची नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत होती.

