महाराष्ट्र ग्रामीण

महात्मा गांधी विद्यालय मराठी भाषा गौरव दीन मोठ्या उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद शिशु वाटिका

अंबरनाथ : महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ पश्चिम येथील स्वामी विवेकानंद शिशु वाटिका शाळेतील ३ ते ५ वयोगटातील बाळगोपाळांनी महाराष्ट्रातील थोर संत,कवी यांची प्रेरणा घेऊन , वेगवेगळ्या प्रकारे वेशभूषा परिधान करत नृत्य सादर करण्यात आले , लहानग्यांचा उत्साह कसा वाढेल मराठी भाषेचे महत्त्व काय हाच उद्देश या कार्यक्रमातून संपन्न झाला.
या आनंदाक्षणी उपस्थित संस्थेच्या पदाधिकारी दीपाली आखरे , तसेच शाळेतील इतर विभागातील पदाधिकारी राजेश रोहिदास , उप मुख्याध्यापक अतुल कुसुंबे , उपप्राचार्य वागीश‌ वरखेडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी तिवारी , मुलांना मार्गदर्शन करणारे संध्याताई,, सुशीलाताई, उषाताई व शीतलताई यांनी केले. या कार्यक्रमाची पूर्णतः रूपरेषा स्वामी विवेकानंद शिशु वाटिका अंबरनाथ पश्चिम येथील शाळेची मुख्याध्यापिका सौ. नंदिनी पवार यांनी केले व उपस्थित मान्यवर यांना शुभेच्छा देत मुलांचे कौतुक करण्यात आले.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button