महाराष्ट्र ग्रामीण
ओमकार युवा मित्र मंडळातर्फे श्री साई भंडाऱ्याचे आयोजन
साई भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

अंबरनाथ : मेठलनगर वरचा पाडा गणेशनगर खुंटवली अंबरनाथ पश्चिम विभागातील ओमकार युवा मित्र मंडळाचा २७ वा वर्धापन दिन ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात साजरा होत असून , कार्यक्रमाची रुपरेषा १)साई पालखी मिरवणूक, २)महिलांसाठी हळदी कुंकू, ३)महाप्रसाद, ४)भजनाचा कार्यक्रम अशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आलेले आहे. याची अंबरनाथ मधील सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी आपण आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ओमकार युवा मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे .


