शिवबा ग्रुपचा अनोखा अंदाज अंबरनाथ पूर्णतः भगवेमय करण्याचा निर्धार
स्वखर्चाने वाटले ४०० झेंडे
अंबरनाथ : शिवबा ग्रुप अंबरनाथ अध्यक्ष सुमित भालेराव हिंदुत्व जागृतेची मोहीम राबविणारे मुळात एक रिक्षा चालक असून,१९ फेब्रुवारी अर्थात शिवजन्मोत्सव (शिवजयंती) येण्याअगोदरच शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित भालेराव यांच्या वतीने एक अनोखा उपक्रम पहायला मिळत असतो. गतवर्षी प्रमाणे यंदाही अंबरनाथ मधील तमाम रिक्षा चालक तसेच दुचाकी
स्वारांना मोफत भगवे झेंडे वाटपाचा कार्य सुमित भालेराव गेली कित्येक वर्षांपासून करत आहे. तसेच आजच्या घडीला देखील कल्याण दिवाणी सत्र न्यायालयाचे सचिव ऍडव्होकेट नरेंद्र तुकाराम बेंद्रे यांच्या हस्ते झेंडे वाटपाच्या कार्यक्रमाला चालना देत हुतात्मा देवराम भाऊ वाळुंज रिक्षा स्टँड येथे सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष मधुकर हजारे, नाभिक समाजाचे अध्यक्ष विलास शिंदे, यूट्यूब स्टार शुभम कुमरे, तसेच शिवबा ग्रुपचे सहकारी वर्ग बाळाराम पारटे, आकाश गुप्ता, मच्छिंद्र हजारे, दिलीप पांढरे, दीपक मुकणे , सार्थक जाधव, पारस तसेच इतर शिवभक्त उपस्थित होते.



