महाराष्ट्र ग्रामीण

वृत्तपत्र विक्रेत्यांवर अतिक्रमणाची कारवाही नको

अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाचे निवेदन

अंबरनाथ : आज अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या माध्यमातून अंबरनाथ मधील वृत्तपत्र विक्रेते यांच्यामार्फत CA सौ तेजश्रीताई करंजुले पाटील नगराध्यक्षा यांना वृत्तपत्र विक्रेत्यांवर अतिक्रमणाची कारवाही नको असे परिपत्रक, (निवेदन) स्वरूपात देण्यात आले. विक्रेत्यांना भविष्यात व्यवसाय करण्यासाठी जे ठाणे महानगरपालिका , बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी पालिकेतर्फे जे GR उपक्रम राबवत आहे अशाच प्रकारचा उपक्रम GR अंबरनाथ मधील वृत्तपत्र विक्रेत्यांवर राबवावा, अशी विनंती केली.
आपल्या विषयाचा पालिकेच्या सभेमध्ये योग्य रीतीने पाठपुरावा करून वृत्तपत्र विक्रेत्यांना योग्य न्याय मिळवून देऊ असे आश्वासन नगराध्यक्षा यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेता संघाचे  पदाधिकारी अरविंद निकम, कुंदन जाधव ,विक्रेते बंधू आशिष गुरव, अरुण निकम, विशाल ठाकरे, मकरंद सावंत, उमेश नाईक, सचिन देवरे तसेच प्रिंट मिडिया समूहाचे न्याय दरबार चे संपादक अशोक नाईक, टाइम्स समूह, मिड्,डे, दैनिक भास्कर, हिंदुस्तान टाइम्स, पुण्यनगरी या समूहाचे प्रतिनिधी वर्ग, व विशेष सहकारी अजय नायर उपस्थित होते.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button