महाराष्ट्र ग्रामीण
कल्याण उपजिल्हा संघटक पदी अंबरनाथच्या मीना सुरेश वाळेकर यांची निवड
महिला वर्गात आनंदाचे वातावरण

शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक पदी सौ.मीना सुरेश वाळेकर यांची निवड करण्यात आली. अंबरनाथ मध्ये महिला वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण , अंबरनाथच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा , शिवसेना अंबरनाथ महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर, स्व. हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार श्रींकात शिंदे यांच्या सुचनेनुसार महिला आघाडी अंबरनाथ शिंदे गट अंबरनाथ शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात उपजिल्हा संघटक म्हणून,सौ.मीना सुरेश वाळेकर यांची निवड करण्यात आल्याने महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मीना वाळेकर यांच्या निवडीने अंबरनाथच्या राजकारणाला मिळणार एक नवी दिशा.