महाराष्ट्र ग्रामीण
अंबरनाथ शिवसेना व उद्योगजग पवन वाळेकर यांच्यातर्फे आर्थिक मदत
मृतक तरुणाच्या परिवाराला दिला धीर

काही दिवसांपूर्वी के टी स्टील कंपनी परिसरात लघु शंकेसाठी गेलेला 16 वर्षीय तरुण विघ्नेश कचरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ह्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून अंबरनाथ शिवसेना व युवा उद्योजक पवन वाळेकर यांच्यातर्फे १ लाख रुपयांची रोख रक्कम पवन वाळेकर यांच्यातर्फे सुपूर्द करण्यात आली.तसेच स्वतःच्या अशोका फूड या कंपनीत कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही देऊ, व महावितरण कंपनीतून योग्य तो पाठपुरावा करून तिथूनही नक्कीच मदत मिळवून देऊ त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहे, असेही स्पष्ट मत व्यक्त करत कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले, याप्रसंगी माजी नगरसेवक रवी करंजुले, प्रकाश वाळुंज, लेनिन मुक्कु, परशुराम जाधव, आकाश वाळेकर, विकास कानडे उपस्थित होते.