वृद्ध महिलेला दिले हक्काचे पक्के घर
मीना ग्लोबल फाउंडेशन सामाजिक संस्थेचा पुढाकार
अंबरनाथ: मेटलनगर पश्चिम परिसरात एका वृद्ध महिलेला मीना ग्लोबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घर बांधून देण्यात आले. मेटलनगर या परिसरात ७० वर्षीय वृद्ध महिला हसीना इस्माईल शेख राहत होत्या त्यांच्या घराची दुरवस्था अत्यंत बिकट होती भिंती पूर्णतः खचलेल्या जमिनीतून,भिंतीतून पाण्याचा प्रवाह येत होता ही बाब लक्षात घेऊन मीना सुरेश वाळेकर व पवन वाळेकर यांच्या पुढाकाराने वृद्ध महिलेला पूर्णतः नवीन घर बांधून देण्यात आले. बुधवारी मीना वाळेकर व सुरेश वाळेकर यांच्या हस्ते फित कापून ७० वर्षीय वृद्ध महिला हसीना शेख यांना नव्याने बांधून दिलेले घर सुपूर्द करण्यात आले. या आनंदाक्षणी ,पवन वाळेकर,संदीप लोटे, रवींद्र करंजुले, प्रकाश वाळुंज,आकाश वाळेकर, रेखा करंजुले,गीता डामसे, अनिता लोटे, यांच्यासह विभागातील नागरिक उपस्थित होते, हसीना शेख व त्यांच्या कुटुंबियांनी याप्रसंगी मीना ग्लोबल फाउंडेशन चे आभार मानले.