श्री.सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खुंटवली
रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
अंबरनाथ : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खुंटवली अंबरनाथ पश्चिम यंदाही श्री राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खास आकर्षण म्हणजे या विभागात बजरंग दलाच्या पालखीचे प्रस्थान होत असते. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलावर्ग, यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत करण्यात आले.
प्रभु श्रीरामाची मोठ्या भक्तीभावने पुजा अर्चना करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते.
मंडळाचे कार्यकर्ते चंद्रशेखर बैनी, संतोष वाघीरे, अशोक कोली, चंद्रशेखर गवळी, श्याम तिरुपती, अजय सिंग, हरीश मुदलियार, अखिलेश गुप्ता, तसेच बजरंग दल पालखी प्रमुख व विभागातील नागरिक, राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री राम नवमी उत्सवाची शोभा वाढवत ,मोठ्या हर्षोल्लासित वातावरणात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.